Dhananjay Munde  Saamtv
महाराष्ट्र

रेणू शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता...

''शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली.''

विनोद जिरे

बीड: पाच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर त्यांनी बीडमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की गेली दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली. ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसापासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. या पुढे जे काही करतील ते पोलीस करतील, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते.

दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना इंदौरच्या रेणू शर्माने (Renu sharma arrested) बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली होती. ५ कोटींची खंडणीची मागणीही (five crore extortion demand) शर्माने मुंडे यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची मुंबई पोलीसांनी तातडीनं दखल घेत (Mumbai Police) शर्मा विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल कोला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर आता इंदौर पोलिसांनी (Indore Police) रेणू शर्माला धनंजय मुंडे यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देखील केली होती. कालांतराने शर्माने मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली होती. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन या महिलेने मुंडे यांना फोन करत ५ कोटी रुपये किंमतीचे दुकान व महागड्या मोबाइलसाठा तगादा लावला होता. तसंच जर मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मिडियावर (Social Media) बदनामी करण्याची धमकी देत, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकीही महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT