Karuna Munde Latest News Saam TV
महाराष्ट्र

Karuna Munde : करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांचा चुना; तिघांवर गुन्हा

याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मोबीन खान, साम टिव्ही

संगमनेर/अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Sangamner Todays News)

त्यानुसार भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग (दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीनही आरोपी करुणा मुंडेंनी काढलेल्या नव्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. (Karuna Munde Latest News)

काय आहे प्रकरण?

या बाबत करुणा मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार (26 ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगमनेर मधील या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून, त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत, त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली.

या कंपनीत 30 लाखांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा 45 ते 70 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले.या बोलण्याला भुलून करुणा यांनी 7 जानेवारी 2022 पासून दहा दिवसांत रोख व धनादेशाच्या स्वरुपात त्यांना 30 लाख रुपये दिले. (Dhananjay Mude's Wife Karuna Munde)

गुंतवणूकीनंतर मात्र या तिघांनी कोणतीही अधिक माहिती व नफा न देता फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी 45 हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर मात्र फोन न घेणे किंवा विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु झाले. तसेच मुंडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली. (Karuna Munde Todays News)

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच करुणा मुंडे यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून योग्य त्या पुराव्यांसह फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT