Dhananjay munde and Walmik Karad 
महाराष्ट्र

Walmik Karad : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता, कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ

Walmik Karad encounter plan : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बीडमधील निलंबित पीएसआय रणजीत कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Walmik Karad encounter plan : निलंबित पीएसआय रणजीत कासलेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा त्यांनी फेसबुक व्हिडिओत केला होता. त्यामध्ये कासले यांनी आता धनंजय मुंडे यांचे नाव घेतलेय.

वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा खळबजनक दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी नवा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्याने बीड आणि राज्यात खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी सोमवारी केला होता. आज त्यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे.

धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटरचा प्रयत्न केला होता. कारण त्यांन ते नको होते. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोपात सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांनी केलाय. धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबले गेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाहीत, असा दावाही रणजीत कासले यांनी केलाय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेनंतर वाल्मिक कराड याला बीड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. मात्र याच तुरुंगात कराडचा काटा काढण्यासाठी ५० कोटी रूपयांर्यंतची ऑफर दिल्याचा दावा रणजित कासलेंनी केला. त्या प्रकरणात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT