तिसऱ्या लाटेत परळीत एकही मृत्यू होऊ देणार नाही धनंजय मुंडेंचा संकल्प विनोद जिरे
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेत परळीत एकही मृत्यू होऊ देणार नाही धनंजय मुंडेंचा संकल्प

परळी शहर येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. त्याचबरोबर येणाऱ्या तिसऱ्या लाटेत परळीतील एकही मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला असून आरोग्य विभागातील सर्वांनी देखील तसा संकल्प करावा असं आवाहन केलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येते न येते, त्यातच तज्ञ आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत आहेत. परळी शहर येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. त्याचबरोबर येणाऱ्या तिसऱ्या लाटेत परळीतील एकही मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला असून आरोग्य विभागातील सर्वांनी देखील तसा संकल्प करावा असं आवाहन केलंय. ते पराळी येथे आयोजित कोविड वॉरियर्सच्या गौरव कृतज्ञता समारोह या कार्यक्रमात बोलत होते. Dhananjay Munde says will not allow any death in the third wave

हे देखील पहा -

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना, ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी रात्र रात्र जागून काढली. एक-एक व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याच काळात परळीतील जनतेला आधार देता यावा, यासाठी आम्ही सेवाधर्म हा उपक्रम सुरू केला होता.

शासकीय सेवेतील व अशासकीय सेवेतील सेवाधर्म जोपासलेल्या, सेवाधर्म उपक्रमातील सेवेच्या सर्व वाहकांचा आज गौरव करून समारोप करताना अभिमान वाटत आहे. अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व कोविड योद्ध्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निस्वार्थपणे स्वतःला झोकुन देऊन काम करणाऱ्या, शासकीय सेवेतील व खाजगी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, पॅरा मेडिकल स्टाफ, कोविड सेंटर चालवणारे अन्य कर्मचारी, महसुली अधिकारी, पोलीस अधिकारी, महावितरणचे अधिकारी, शिक्षक, लसीकरण प्रक्रियेतील कर्मचारी, सेवाधर्म अंतर्गत काम केलेले स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, रुग्णांना जेवण पुरवणाऱ्या संस्था, मोफत सेवा दिलेले रिक्षाचालक, विविध अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर्स, स्मशान भूमीतील कामगार, त्याचबरोबर पत्रकारांचा देखील कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT