Cricket Stadium  Saam tv
महाराष्ट्र

Cricket Stadium : बीडमध्ये राष्ट्रीय दर्जाचं 65 कोटींचे क्रिकेट स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde on Cricket Stadium : 'राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी क्रिकेट स्टेडियमसाठी निधी मंजूर केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर भूमिपूजन होईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली

विनोद जिरे

Dhanjay Munde News :

बीडच्या परळी शहरात 65 कोटी रूपये खर्च करुन राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निधी मंजूर केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर भूमिपूजन होईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

परळी शहरात आयोजित नामदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, झहीर खान यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

आयपीएलच्या धर्तीवर बीपीएल देखील खेळवले जाणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली. 'नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी परळी शहरांमध्ये नामदार चषक टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सातशे खेळाडूंची पुढच्या वर्षी आयपीएलच्या धर्तीवर पीपीएलमध्ये बोली लावली जाणार, असं धनजंय मुंडे यांनी सांगितलं.

संयोजक अजय मुंडे काय म्हणाले?

'ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठीच नामदार चषक आयोजन केलं असल्याचा संयोजक अजय मुंडे यांनी सांगितलं.

जहीर खान काय म्हणाला?

माजी क्रिकेटपटू जहीर खान म्हणाला, 'क्रिकेट पाहून खूप आनंद झाला. मी श्रीरामपूरमधील आहे, मी अशा टुर्नामेंटमध्ये खूप खेळलो. परळी शहराला अशा सुविधा मिळाल्या तर नक्कीच चांगले खेळाडू घडतील. देशासाठी खेळायची संधी मिळेल. सर्वाना शुभेछा'.

युवराज सिंग काय म्हणाला?

युवराज सिंग म्हणाला, 'मी छोट्या शहरातून पुढे आलो आहे. टेनिस बॉलपासून सुरूवात केली. बीडमध्ये स्टेडियम होत असेल तर मोठी बाब आहे. छोट्या शहरात क्रिकेटचा खरा आनंद आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Scalp Massage Tips: आठवड्यातून दोन वेळा करा 'स्काल्प मसाज', केसांची होईल भरभर वाढ

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT