Dhananjay Munde Resign Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : 'धनंजय मुंडेंना सहआरोपी करा' राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक, खंडणी प्रकरणात मुंडेंचा सहभाग?

Dhananjay Munde Resign : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना सरपंच हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जातेय. मात्र मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी का केली जातेय? आणि मुंडेंच्या अडचणी कशा वाढत आहेत? पाहूयात या रिपोर्टमधून.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय. मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. कारण धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली जातेय. तर मुंडेंवर 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलीय.

सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे.. त्यातच आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येवेळी क्रुरतेची हद्द पार केली.. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. त्यापार्श्वभुमीवर मुंडेनी राजीनामा दिलाय. मात्र आता सुधारित चार्जशीट दाखल करुन मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि मुंडेंमध्ये फोन झाल्याचा आरोप सुळेंनी धसांच्या वक्तव्याचा हवाला देत केलाय.

धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी ज्यामुळे केली जात आहे त्याला कारण आहे ते दोन कोटींच्या खंडणीचं. अवादा कंपनीकडून धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्यावर कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात.

खंडणी प्रकरण मुंडेंवर शेकणार?

- 14 जून

आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक

- 19 जून

आवादा आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक

कराड आणि मुंडेंकडून 3 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप

बैठकीत 2 कोटींच्या खंडणीवर सहमती

आवादा कंपनीकडून 50 लाख तातडीने घेतल्याचा आरोप

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड मुख्य सुत्रधार असला तरी सुदर्शन घुले टोळीप्रमुख असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडला वाचवणारी पोलिसांची टोळी धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार की मुंडेंच्या राजीनाम्याने हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT