भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
सरपंच हत्या प्रकरणाच्या तब्बल 85 दिवसानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. सरपंच हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं समोर आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. तर आता मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानियांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंच्या आमदारकीकडे वळवत मुंडेंना चॅलेंजच दिलंय.
फक्त वाल्मिक कराडसोबतचे संबंधच नाही तर धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते भ्रष्टाचारापर्यंत अनेक आरोप करण्यात आलेत.. ते आरोप काय आहेत? पाहूयात.
- व्यंकटेश्वर इंडस्ट्रीजमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक संचालक
- धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप
- मुंडेंनी कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिल्याचा आरोप
- कृषी साहित्याच्या खरेदीत मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
- बीड जिल्हा नियोजन विभागात मुंडेंचा 72 कोंटींचा घोटाळा
- पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप
- धनंजय मुंडेंवर पीक विमा घोटाळ्याचा आरोप
- हार्वेस्टर घोटाळ्यात मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप
अंजली दमानियांनी सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलाय. त्यातच दमानियांनी आता मुंडेंची आमदारकी रद्द करण्याचं आव्हान दिलंय.. त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार का? आणि मंत्रिपदापाठोपाठ मुंडेंची आमदारकी जाणार का? याचीच उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.