dhananjay munde, pankaja munde, gram panchayat elections 2022 saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections : पंकजाताईंना धनुभाऊंचा धक्का; 'या' ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुन्हा

ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विनोद जिरे

Gram Panchayat Election : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाऊ धनंजय मुंडेंनी राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा माेठा धक्का दिला. गोपीनाथ गड असलेली पांगरी ग्रामपंचायत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. (Maharashtra News)

ग्रामपंचायतीचा सरपंच आणि अकरा सदस्यांपैकी दहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत (grampanchayat) बिनविरोध काढत धनंजय मुंडे यांनी पांगरी ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. सुशील वाल्मीक कराड असं बिनविरोध झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

विशेष म्हणजे पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (gopintah munde) यांचे स्मृतीस्थळ गोपीनाथ गड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धोबीपछाड केली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकी अगोदरच गुलाल लागल्याने परळी मधील 80 ग्रामपंचायत निवडणुकीत (election) धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT