Dhananjay munde karuna sharma Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : 'कराड ते करुणा', कराडनंतर करूणा प्रकरणात मुंडेंची अडचण; राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार

Dhananjay Munde Domestic Violence Case: घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. मुंडेंना कोर्टानं हा झटका का दिला? त्यांनी कोणत्या पत्नीवर घरगुती हिंसाचार केले? मुंडेंना कोर्टानं नेमकी का शिक्षा दिली? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

वाल्मिक कराड प्रकरण पिच्छा पुरवत असताना धनंजय मुंडेंच्या मागे आता करूणा मुंडे प्रकरण सुरू झालंय. करूणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराच्या दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी कोर्टाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय. करूणा मुंडे आणि मुलगी शिवानीला महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने नेमका काय निर्णय दिलाय? पाहूयात.

कोर्टाचे आदेश काय?

- धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य

- करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी, कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा

- करुणा मुंडेंना दरमहा 1 लाख 25 हजारांची पोटगी द्या

- मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75 हजार पोटगी देण्याचे आदेश

वांद्रे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले. न्याय मिळाला असला तरी महिन्याला 15 लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं करूणा मुंडेंनी सांगितलं. एवढंच नाही तर मुंडेंकडे 500 कोटींच्या संपत्ती असल्याचा दावाही करुणा मुंडेंनी केलाय. तर मुंडे दोषी आढळल्याने दमानियांनी मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलाय. धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिलीय पाहूयात.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

- करुणा शर्मांबाबतचा आर्थिक निकषांवर अंतरिम भरपाईचा आदेश

- पूर्वी शर्मांसोबत लिव्ह इनमध्ये असल्याचं कबूल केल्यानं कोर्टाचा निर्णय

- कोर्टाकडून घरगुती हिंसाचाराबाबत कोणताही निष्कर्ष नाही

सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची झालेली कोंडी, दुसरीकडे कृषी खात्यातील भ्रष्टाचारावरुन सुरु उडलेली राळ. आणि आता कौटुंबिक संघर्षात कोर्टानं थेट दोषी ठरवल्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय. एवढ्या साऱ्या वादांच्या मालिकेत अडकलेले मुंडे सुरक्षित बाहेर पडणार की त्यांची मंत्रिपदाची विकेट जाणार याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चाललीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT