Munde damaniya Saam Tv News
महाराष्ट्र

Dhananjay Munde: मंत्रिमंडळाच्या ठरावाशिवाय २०० कोटी रुपये उचलले, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Vijay Kumbhar on Munde Controversy: अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर विजय कुंभार यांनी दुजोरा दिला आहे. तसेच मंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलंय. या धक्कादायक घटनेला २ महिने उलटले. तरीही खरा मारेकर्‍याचा सुगावा अद्याप लागलेला नाही. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड यांच्याकडे संशयाची सुई फिरत असल्याचं म्हटलं जातंय. विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघडकीस करत धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत.

अशातच धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर न करून घेता परस्पर २०० कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावर विजय कुंभार यांनी ट्विट करत दुजोरा दिला आहे.

सनसनाटी आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापलंय. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या मागे आरोपांचं सत्र सुरूच आहे. नुकतंच मुंडेंवर अंजली दमानिया यांनी मोठा घोटाळा केलं असल्याचं सांगत सनसनाटी आरोप केले आहेत. दमानिया यांनी केलेल्या आरोपाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील दुजोरा दिला आहे.

विजय कुंभार काय म्हणाले?

'मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून न घेता यापूर्वीही अशा प्रकारचे पैसे उचलण्यात आले आहेत, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. राज्य सरकारच्या बहुचर्चित ॲम्बुलन्स खरेदीसाठी १३ मार्चला ठराव मंजूर करण्यात आला होता. १५ मार्चला शासन आदेश मंजूर करण्यात आले होते', असाही दावा विजय कुंभार यांनी केला आहे.

'त्यामुळे जे अशाप्रकारचे सर्वसामान्य जनतेची आणि सरकारची दिशाभूल करून चुकीचे निर्णय घेतात. तसेच पैसे उचलतात त्या अधिकार्‍यांवर आणि मंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी', अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

दमानियांचा आरोप

मंत्रिमंडळानं कोणताही निर्णय घेतलेला नसताना मुंडे यांनी खोटे आदेशानं कार्यवाही करण्याचा लेखी आदेश दिला असल्याचा दावा दमानिया यांनी केला. पूर्वीचा ३४२ कोटींचा, हा ऑडिशनल २०० कोटी रूपयांचा घोटाळा आहे. मुंडे यांची मंत्रि‍पदावर बसण्याची पात्रता नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT