बीड : "कशात किती खावं.. हे भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांना कळालं नाही, आता फक्त निवडणुका होऊद्या, कारवाईला कमी पडायचं नाही" असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी, विरोधकांना दम भरला आहे. पाटोदा (Patoda) नगरपंचायतीच्या निवडणुकीतील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार अमरसिंह पंडित, यांची उपस्थिती होती.
हे देखील पहा :
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की मराठा (maratha) ओबीसी (OBC) आरक्षण रद्द झाले, याला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपावाले करत आहेत. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅस वाढला, महागाई गगनाला भिडली, त्याला कोण जबाबदार ? यावर विरोधक का बोलत नाहीत ? असे म्हणत केंद्र सरकारवर धनंजय मुंडेंनी टीका केली.
तसेच येत्या 21 तारखेला आष्टी- पाटोदा -शिरूर ची घाण काढायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ला मतदान करा. असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. ज्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी 50 कोटीच्या कामाच्या भूमीपूजनाला येऊ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पाटोदा करांना आश्वासित केले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.