Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti, Pandharpur News, Vitthal Darshan saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

Vitthal Darshan : या घटनेची सखाेल चाैकशी मंदिर समितीद्वारे सुरु आहे.

Siddharth Latkar

Pandharpur News : पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी भाविकांकडून पैसे घेण्याचा प्रकार आज (बुधवार) उघडकीस आला आहे. याबाबत दाेघांची कसून चाैकशी सुरु आहे. चाैकशीअंती दाेषी आढळल्यास दाेघांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

अधिक मास निमित्ताने पंढरपूरात (pandharpur) भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या कमला एकादशी निमित्त जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविक शनिवारी पंढरीत दाखल झाले हाेते.

दरम्यान श्री विठ्ठल दर्शनास भाविकांकडून पैसे घेऊन सोडण्याचे रॅकेट आज समोर आले आहे. हैद्राबाद मधील तीन भाविक दर्शनास आल्यानंतर त्यांना गाठून दाेन जणांनी (एजंट) प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी करून विठ्ठल दर्शनास सोडण्याचा प्रयत्न केला.

भाविकांना विठ्ठलाचे दर्शनास सोडत असताना भाविकांची चौकशी केली असता याबाबतचा प्रकार उघडकीस आला. या दाेन्ही एजंटांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशी नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

दरम्यान मंदिर समिती मधील या पेड दर्शन साखळीत कोण काेण सहभागी आहेत यांचा शोध घेणे गरजेचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

SCROLL FOR NEXT