जड अंतकरणाने भक्तांचा बाप्पाला निरोप
जड अंतकरणाने भक्तांचा बाप्पाला निरोप अरुण जोशी
महाराष्ट्र

जड अंतकरणाने भक्तांचा बाप्पाला निरोप

अरुण जोशी

अमरावती - गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असलेल्या गणपतींना आज जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. कोरोनामुळे Corona याहीवर्षी मिरवणुकीला परवानगी नसल्याने मिरवणुकीचा कुठलाही गाजावाजा न करता गणपतीचे विसर्जन करण्यात आले. अमरावती Amravati शहरातील छत्री तलाव ,वडाळी परिसरातील प्रथमेष तलाव व शहरातील पाचही झोन मध्ये आर्टिफिशियल तलावाची व्यवस्था बाप्पाला निरोप देण्याकरिता करण्यात आली होती.

हे देखील पहा -

शहराच्या छत्री तलाव परिसरात भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन करण्याकरिता येत असतात. त्या अनुषंगाने चोख व्यवस्था महानगर पालिका व पोलिसांकडून ठेवण्यात आली होती.तलावाच्या बाजूने तीन छोटे कुत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यामध्ये मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती तर मूर्तीवरील निर्माल्या साठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जन स्थळी कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. जिल्ह्यात आज सकाळ पासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने गणपती मिरवणुकीवर प्रतिबंध आणले आहे. मात्र, गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर कलम 144 लागू करण्यात आलेली असून या मार्गावर पोलिसांचा नेहमीप्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, हे विशेष.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Record: आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

Shinde vs Thackeray : हातकणंगलेत हायव्होल्टेज राडा! शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

Actor Shekhar Suman joins BJP: मोठी बातमी ! अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT