Maharashtra CM Devendra Fadnavis and Deputy CM Eknath Shinde amid rising tensions over pending urban development files. saam tv
महाराष्ट्र

शिंदेंच्या खात्यांवर फडणवीस भडकले? फाईलींवरुन रंगलं कुरघोडीचं राजकारण?

Power Struggle In Maharashtra Govt: महायुती सरकारमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगलीय.... मात्र या संघर्षाचं नेमकं कारण काय आहे? मुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावर का भडकले? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Bharat Mohalkar

त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा आढावा घेतला... कोणत्या प्रकल्पांच्या फाईली नगरविकास खात्यात पडून आहेत, असा प्रश्न विचारला... प्रकल्पाच्या नावासह फाईली देण्यास अतिरिक्त मुख्य सचिवांना आदेश दिले... त्यामुळे नगरविकास खात्यातील नोकरशहा अस्वस्थ झाले... त्यांनी फाईली पाठवल्या नाहीत... त्यानंतर या फाईली का रोखल्या? फाईली मुख्यमंत्री कार्यालयाकडे का पाठवल्या नाहीत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला... त्यावर शिंदेंच्या खात्याचे सचिव निरुत्तर झाले.... कारण या फाईली वर्षभरापासून नगर विकासच्याच टेबलावर पडून होत्या...

खरं तर 1995 पासून सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं स्वतःक़डे ठेवलं...मात्र 2024 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे खातं शिंदेंकडे दिलं...मात्र वर्षभरात नगरविकास खात्याचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत... त्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरेही ओढले... आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकल्प रद्द केले... त्यामुळे नगरविकासच्या अनेक प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावल्यानंच शिंदे आणि फडणवीसांमध्ये कुरघोडी रंगल्याची चर्चा होती.. त्यामुळेच या फाईली शिंदेंनी ऱोखून धरल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.....मात्र वर्षभरात कुरघोडीचं राजकारण रंगल्याची ही काही पहिलीच वेळ नाही.... तर याआधी अनेकदा महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली होती...

अजितदादांच्या निधनानंतर महायुतीतील कुरघोडी कमी झाल्याची चर्चा होती... आता पुन्हा एकदा शिंदेंच्या खात्यातील फाईली रोखल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध फडणवीस आमने-सामने येणार का? आणि महायुतीतील संघर्ष आणखी पेटणार का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT