"CM Devendra Fadnavis addresses media on Maratha reservation issue, targets opposition over Manoj Jarange Patil protest at Azad Maidan." Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maratha Andolan : जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, याचा तोटाच होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

Devendra Fadnavis on Maratha Reservation : फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केला की, ते मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. भाजपकडून मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू

  • आरक्षणासाठी अखेरची लढाई, मनोज जरांगेंचा निर्धार

  • मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा फडणवीसांचा आरोप

  • मराठा समाजाला आधीच १० टक्के आरक्षण दिले असल्याचे बावनकुळेंनी केले स्पष्ट

Maratha Reservation, Manoj Jarange Protest, Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा दिला जात आहे. विरोधकांकडूनही जरांगेंच्या आंदोलानाला पाठिंबा दिला जातोय. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला असून मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. यामुळे फायदा न होता नुकसानच होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. याआधी काय झाले त तुम्ही पाहिले आहे, आजही आंदोलनाला करता सोयी सुविधा देणारे कोण आहे, हे पाहायला मिळतेय. पण ठिकाय, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यातून त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले - बावनकुळे

संपूर्ण देशात आंदोलन सुरू होते, EWS निर्णयानंतर ओबीसी बाहेर असलेल्यांना आरक्षण मिळालं, 10 टक्के आरक्षण आणि सारथी माध्यमातून मराठा समाजाला फायदा होत आहे. ओबीसी आरक्षण न जाता मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. कॉंग्रेसने ओबीसीतून आरक्षण द्या म्हणत आहे का? हे भूमिका स्पष्ट करावी.. मराठा समाजाला 10 टक्के दिले, यात आणखी काय देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे.. पुढच्या काळात मराठा समाजाला न्याय आमचे सरकार न्याय देईल...

मराठा समाजाच्या हिताचे निर्णय फडणवीस सरकारने घेतले -

२०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १४% आरक्षण देण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते आरक्षण टिकले नाही. योग्य वकील कोर्टात उभे केले गेले नाहीत, त्यामुळे आरक्षणाची बाजू टिकवता आली नाही. त्याची जबाबदारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे. पण महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं. असं सांगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : भाजपचा पहिला आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Manoj Jarange: आझाद मैदानावर जेवण बंद, शौचालयाला कुलूप; मनोज जरांगे भडकले, VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT