Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the state assembly, strongly countering the opposition's allegations over the Mumbai-Pune Missing Link landslide. saam tv
महाराष्ट्र

एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील; देवेंद्र फडणवीस सभागृहात प्रचंड संतापले

Devendra Fadnavis Speech In Maharashtra Assembly On Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

राज्यभरात पवासाने हाहाकार माजवला असून याच पावसामुळे मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. यावरच विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज या सगळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर देत विरोधी पक्षावर तोफ डागली. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी सरकारवर अवाजवी टीका केली. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारने 18 तासांत मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्ववत केली. भविष्यात मिसिंग लिंकवरून आमच्यावर टीका करणारे शिल्लक राहणार नाहीत. पण 10 वर्षांनी मिसिंग लिंक असेल, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल.

मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर चढवला. पुढे देवेंद्र फडणवीस आक्रमक होत म्हणाले, ज्यांना कुत्रा नाही विचारत, ते आज सोशल मीडियावर येऊन शिव्या देत आहेत. असे भाड्याचे तट्टू मिसिंग लिंकबाबत पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहत होते. या सगळ्यांना मी एकच सांगतो की, महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

मिसिंग लिंकवर दरड कोसळन्याच्या घटनेने आपण काही गोष्टी शिकलो, पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दर कशी कोसळू शकते, हे आपल्याला लक्षात आले. त्यामुळे आता आपण आयआयटीमधील तज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणायात आहोत. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाण्यात थरकाप! घोडबंदर रोडवर रिक्षावर गॅस टँकर उलटला; दोघांचा जागीच मृत्यू, पावसात वाहतूक विस्कळीत

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Diabetes Kidney Health : किडनी खराब होत असतानाही दिसत नाहीत ही लक्षणं! मधुमेहींनी आजपासूनच फॉलो करा या सवयी

Diabetes: टाइप 1 मधुमेहात ब्लड शुगर किती असावी? जाणून घ्या योग्य आकडे

अवघ्या २ मिनिटांत बनवा बडीशेप सरबत, चव आणि आरोग्यासाठी जबरदस्त

SCROLL FOR NEXT