devendra fadnavis chhagan bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भुजबळांना देवेंद्र'बळ'! फडणवीसांनी भुजबळांना उद्देशून केली शेरोशायरी, "मैं अकेला ही चला था.."

Maharashtra Political News: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमाला ते दोघे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे.

Saam Tv

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना मांडल्या. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावरही पोहोचले होते. आता एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याजवळील नायगाव या सावित्रीबाईच्या मूळगावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाराज छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. ते एकत्रच कार्यक्रमाला पोहोचले असेही म्हटले जात आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना उद्देशून एक शेर म्हणून दाखवला.

छगन भुजबळ म्हणाले, "हरी नरके यांनी या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. देवेंद्र जी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात म्हणून तुमचे धन्यवाद. सावित्रीबाईच्या नावाने पुरस्कार दिला जात होता. तो पुन्हा सुरु करुन सावित्रीबाईच्या जयंतीदिनी द्यायला हवा. महात्मा फुलेंच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हायला हवे अशी विनंती करतो." त्यानंतर त्यांनी 'वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से' हा शेर भुजबळांनी म्हटला.

भुजबळ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांनी बोलताना भुजबळ यांना उद्देशून 'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया' हा शेर म्हटला. पुढे त्यांनी नायगावच्या सरपंचांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले. सहा वर्षांनी सावित्रीबाई फुलेंची द्वीशताब्दी सुरु होणार आहे. त्याआधी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT