Devendra Fadnavis In Mumbai saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Devendra Fadnavis In Mumbai : विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्याचा बदला घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र आता आम्ही सर्व विरोधकांना माफ केलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Chandrakant Jagtap

Devendra Fadnavis News: आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्याचा बदला घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र आता आम्ही सर्व विरोधकांना माफ केलं, हाच आमचा बदला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 'मी विधानसभेत बोलताना म्हटलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला, त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ आणि आमचा बदला हा आहे की आम्ही सर्वांना माफ केलं. आता आमच्या मनात कोणताही कटूता नाही' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

संजय राऊत यांना टोला

यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांना देखील टोला लगावला आहे. 'मला फक्त एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. आपल्याकडे होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. परंतु काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात, त्यांना मला एकच सांगायचं आहे. एक दिवस ठिक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंना कटुता संपवण्याचं आवाहन?

आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती असे म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना देखील कटूता संपवण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनाला उद्धव ठाकरे साद देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान यापूर्वी देखील आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शत्रुत्व नाही असे विधान केले होते. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT