Devendra Fadnavis On Rohit Sharma Saam Digital
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Rohit Sharma : रोहित शर्माने आनंदही दिला अन् दु:खही; सत्कार समारंभात देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Team India In Vidhan Bhavan : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जसा विश्वचषक जिंकून आनंद दिला, तसंच त्यांनं सर्व भारतीयांना दु:खही दिलं. असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात काढले.

Sandeep Gawade

टी-२० विश्वचषक भारताने जिंकून संपूर्ण भारतीयांची मनं जिंकली आहेत. मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जसा विश्वचषक जिंकून आनंद दिला, तसंच त्यांनं सर्व भारतीयांना दु:खही दिलं. कारण त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून त्याच दिवशी निवृत्ती जाहीर केली, असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात काढले. आज टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल विधानभवनात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य सरकारकडून भारतीय संघाला ११ कोटींचं बक्षीसही देण्यात आलं.

भारतीय संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या चार खेळाडूंनी महाराष्ट्राला धन्य केले आहे. रोहित शर्माचं नाव तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं आहे. टी-२० त सर्व रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे, असं सांगत त्यांनी रोहित शर्माची संपूर्ण कारकीर्द सभागृहात मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सत्ताकर समारंभातही ठाकरे गटाला डिवचण्याची संधी सोडली नाही. राजकारण आणि क्रिकेट सारखेच आहे. राजकरणात कधी, कुठे, कोण, कोणाची विकेट जाईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यात सूर्यकुमारने घेतलेला झेल विसरला जाणार नाही. तसंच आमच्या ५० जणांच्या संघाने दोन वर्षांपूर्वी घेतलेली विकेटही विसरली जाणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

सत्कार सभारंभात बोलताना रोहित शर्माने, सूर्याने आता सांगितलं की बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला नाहीतर त्याला मी बसवला असता., असं रोहित शर्माने वक्तव्य केलं. रोहित शर्माच्या या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनीही आपल्या शैलीत फटकेबाजी केली. रोहितनं सांगितलं की, कॅच नसता घेतला तर तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं, असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी विधानभवन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT