Narhari Zirwal Saam Tv
महाराष्ट्र

Narhari Zirwal: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांचा राजीनामा कधी घेणार? मुख्यमंत्र्यांनी काय संकेत दिले?

Devendra Fadnavis on Narhari Zirwal Resignation: नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार का, यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार का?

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर नरहरी झिरवाळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या व्हिडिओत नरहरी झिरवाळांसोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.यानंतर आता नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार की नाही, यावर देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे.

नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार? (Narhari Zirwal Resignation)

काल देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मध्यंतरी त्यांच्या कार्यालयातून भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला होता. एका अधिकाऱ्याने लाच घेतली होती. तेव्हापासून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता व्हिडिओ प्रकरणामुळे ही मागणी पुन्हा केली जात आहे. यावर खरंच नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? (Devendra Fadnavis on Narhari Zirwal Resignation)

नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या काळात जी घटना घडली त्याची पूर्ण चौकशी झाली. त्यात कुठेही झिरवळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, त्यामध्ये जे व्हिडिओ आहेत ते गंभीर आहेत. त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. जर हे व्हिडिओ खरे असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच. पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, व्हिडिओ येतात याच्यावरुन आपल्याला या सर्व गोष्टी ठरवता येणार आहे. फोटो आणि व्हिडिओत सहभाग आहे का, सहभाग असेल तर कारवाई होईल. या प्रकरणात कोणालाही सोडण्याचे कारण नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT