Dhananjay Munde Resignation 
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Dhanjay Munde: मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा स्वीकाराला आहे. तो राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारून पदावरून मुक्त केलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर दिलीय.

संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काल रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजीनामा घेणं किती आवश्यक आहे, याची माहिती दिली. तसेच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्यातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरात संतापाचा लाट पसरली, आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. मुंडेंचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला

धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवलाय. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलंय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यांनी दिली. यावर सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखा यांनी प्रतिक्रिया देत सरकारला जाब विचारलाय. अडीच महिन्यात जिल्ह्याचे, गावाचे, समाजाचे नुकसान झालंय ते कोण भरून देणार, ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्‍यांनी घेतली पाहिजे,असही धनंजय देशमुख म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT