Devendra Fadnavis  SAAM TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : भारत हिंदू राष्ट्रच, हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis News : मला अतिशय मनापासून आनंद आहे की मला अयोध्येत येता आलं.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजप नेत्यासह अयोध्येत दाखल होतील. लखनौमध्ये पोहोचल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं.

मला अतिशय मनापासून आनंद आहे की मला अयोध्येत येता आलं. एकीकडे शिवसेना भाजपचे नेते अयोध्या दौऱ्यावर आहेत. तर राज्यातील बळीराजा संकटात आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यावर बोलताने फडणवीस म्हणाले की, विरोधकांचं टीका करण्याच कामच आहे. त्यांना आस्था नसेल आमची आस्था आहे. (Latest Marathi News)

प्रभू श्रीरामाने राज्यकारभार कसं चालवावं हे आपल्याला दाखवलं आहे. तसेच गांधींजींची देखील रामराज्याची संकल्पना होती. रामराज्याची संकल्पाना राबवायची असेल तर रामाचं दर्शन घेतलंच पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहातात. त्यामुळे तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, पण भारत हिंदू राष्ट्रच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना आम्हाला मान्य नाही या शरद पवारांच्या भूमिकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. (Breaking Marathi News)

शिवसेना आणि भाजची युती 100 टक्के नैसर्गिक आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तर विचारांनी मिळते हेच एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT