Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh: देशमुखांना जेल, परमबीरांसोबत डील? अनिल देशमुखांचे फडणवीसांवर नवे आरोप

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यात डील झाल्याचा नवा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.

Tanmay Tillu

राज्याच्या राजकारणात सध्या जुन्या वादग्रस्त प्रकरणांवरुन नव्यानं आरोपप्रत्यारोप रंगू लागलेत. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यामान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं दिसतंय. देशमुखांवरील कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विरोध पक्षनेत्याचं कसं ऐकणार, असा सवाल फडणवीसांनी केला होता. त्यावर परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये डील झालं होतं, असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.

अनिल देशमुख यांच्या आरोपण उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या सांगण्यावरून एखादा कमिशनर आरोप लावले, हे शक्य आहे का? त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की, नाही? त्यामुळे मला असं वाटतं, अशा प्रकारच्या कपोलकल्पित गोष्टीत ते (अनिल देशमुख) बोलून राहिले आहेत, त्यामध्ये काही अर्थ नाही.''

मुकेश अंबानी यांच्या 'अँटेलिया'समोर सचिन वाझेनं गाडीत बॉम्ब ठेवला. त्यानंतर एकामागे एक घटनांची मालिका सुरू झाली. यावेळी भाजपनं विरोधी बाकांवरुन आक्रमक राजकारण केल्यानं देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. याच प्रकरणाबाबत आता देशमुखांनी माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग आणि फडणवीसांवर आरोप केलेत. यावर फडणवीसांनी पलटवार केलाय. ते म्हणाले आहेत की, झूठ बोले, कौआ काटे.

अँटेलिया प्रकरणानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने राहिले असताना जुन्या वादग्रस्त प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलंय. आरोप-प्रत्यारोपांचं डील कोणते नवे खुलासे करणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

SCROLL FOR NEXT