Thackeray Group: 'मातोश्रीवरील चौकडी ठाकरेंना भेटू देत नाही', अनेक बड्या नेत्यांचे राजीनामे; ठाकरे गटाला मोठी गळती?

Maharashtra Politics: ठाकरे गटातला अंतर्गत कलह समोर आलाय, मातोश्रीवरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही, असं म्हणत कुर्ला विभागप्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखाप्रमुखांनी राजीनामा दिलाय
'मातोश्रीवरील चौकडी ठाकरेंना भेटू देत नाही', अनेक बड्या नेत्यांचे राजीनामे; ठाकरे गटाला मोठी गळती?
Thackeray GroupSaam Tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातला अंतर्गत कलह समोर आलाय, मातोश्रीवरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही, असं म्हणत कुर्ला विभागप्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखाप्रमुखांनी राजीनामा दिलाय. तर पालघर जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील यांनीही राजीनामा दिलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि पालघर विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपविभागप्रमुख ते सर्व शाखाप्रमुख आणि महिला संघटकांचे राजीनामे दिले आहेत. कुर्ला विधासनभेतील पदाधिकाऱ्यांचा रवी म्हात्रेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी अडथळे निर्माण करत असल्याचा म्हात्रेंवर आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

'मातोश्रीवरील चौकडी ठाकरेंना भेटू देत नाही', अनेक बड्या नेत्यांचे राजीनामे; ठाकरे गटाला मोठी गळती?
Anil Deshmukh: देशमुखांना जेल, परमबीरांसोबत डील? अनिल देशमुखांचे फडणवीसांवर नवे आरोप

तर पालघरच्या जिल्हाप्रमुख यांनी संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य आणि नेते विनायक राऊत यांच्यावर खापर फोडले आहे. विश्वासात न घेता परस्पर पालघर जिल्ह्याच्या नियुक्त्या केल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये रोष असून विनायक राऊत दमदाटी करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

दरम्यान, याआधी ऐरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. नवी मुंबईतील ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता.

'मातोश्रीवरील चौकडी ठाकरेंना भेटू देत नाही', अनेक बड्या नेत्यांचे राजीनामे; ठाकरे गटाला मोठी गळती?
Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच, कँम्प परीसरात वाईन शॉपची तोडफोड; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ऐरोतील मनोज हळदणकर यांनी चांगली ताकद आहे. उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र अचानक हळणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का येथे बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com