Devendra Fadnavis leaves for Delhi will meet Amit  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, शाहांची घेणार भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा?

उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, शाहांची घेणार भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा?

Satish Kengar

Maharashtra Cabinet Expansion: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. इथं ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

या भेटीत गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते, असं बोललं जात आहे. मात्र याबाबत अधीकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला आता वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस हे दिला रवाना झाला आहेत. फडणवीस हे नागपूरला जाणार होते, अशी चर्चा होती. मात्र ते ऐनवेळी दिल्लीला रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)

दिल्लीत फडणवीस हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. याच चर्चेतनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील हे दोन्ही नेते दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत, असं बोललं जात आहे.

दिल्लीत शिंदे आणि फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदारांना साधी द्यावी यांची नावे देखील निश्चित करणार आहेत. तसेच भाजपचे १०५ आमदार असल्याने त्यांना जास्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहेत. तर या विस्तारात शिवसेनेतील किती आमदारांना संधी मिळेल हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khodala Waterfall: मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यावर भिजायचा प्लान करताय? 'हा' स्पॉट ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

मला xxx काढता का? तुमचा माज...; अजित दादांच्या आमदाराची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

Prajakta Mali: 'एक नंबर तुझी कंबर...' प्राजक्ताच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

Pune Flood : पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ | VIDEO

SCROLL FOR NEXT