Girish Mahajan AND Eknath Khadse Saam Tv
महाराष्ट्र

Girish Mahajan : एकनाथ खडसेंनी केलेल्या 'त्या' विधानावर गिरीश महाजन आजही ठाम; म्हणाले...

एकनाथ खडसे यांच्या बाबतीत केलेल्या विधानावर ठाम असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

संजय महाजन

Girish Mahajan News : 'झालं गेलं विसरून जा, बसून मिटवून घेऊ' अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. याच संदर्भात एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी आपण कधीही बोललो नसल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी सांगितलेल्या विषयाचे खंडन केले होते. मात्र, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले.

'देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या विधानाचे साक्षीदार आहेत. आजूबाजूचे लोकही साक्षीदार असल्याचं सांगत खडसे यांनी आपल्यासमोर असं आपण बोललो नसल्याचं सांगून द्यावे, असं आव्हान महाजन यांनी खडसे यांना दिलं आहे.

भुसावळ येथे रिपाई पक्षाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. खडसे यांच्या भाजपमध्ये घरवापसी विषयी चर्चा सुरू असल्याचं गिरीश महाजन यांना सांगितलं. त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ते दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांना भेटीसाठी गेले होते. मात्र, त्याची भेट होऊ शकली नाही, ते त्यांना कोणत्या कारणासाठी भेटीसाठी गेले होते हे नक्की असल्याचं असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजपा मध्ये वापसी विषयी चर्चा सुरू असल्याचं गिरीश महाजन यांना सांगितलं असता त्यांनी या बाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले,ते दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांना भेटी साठी गेले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही,ते त्यांना कोणत्या कारणा साठी भेटी साठी गेले हे आपल्याला माहीत नाही. मात्र ते अमित शाह यांच्या भेटी साठी गेले होते हे नक्की असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

खडसे यांच्या सोबत असलेले मनभेद दूर करण्यासाठी भाजपची काय भूमिका आहे ? यावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, 'आमचे नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. मात्र, या विषयी बैठक होईल का आणि निर्णय होईल, एवढा हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही, असं गिरीश महाजनांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT