पुण्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे फडणवीसांची भूमिका महत्त्वाची
फडणवीसांच्या पुणे-केंद्रित रणनीतीमागे मोठे राजकीय गणित
या रणनीतीचा दिल्लीतील राजकारणाशी काही संबंध आहे का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा
महाराष्ट्राचे शैक्षणिक हब, औद्योगिक इंजिन आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या पुण्यावर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतयं. तिरंगा रॅली, लीडरशिप समिट आणि पुणे मेट्रोचे उद्घाटन अशा वेगवेगळ्या प्रकल्पात फडणवीस जातीनं उपस्थित राहतायत.मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बोलवणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे.
जर त्यांना आता केंद्रात मंत्रिपद मिळालं तर ते थेट राज्यसभेत जाणार . मात्र एकदा दिल्लीत गेले की आगामी निव़डणुकीतून लोकसभेत जाणंच पसंत करतील..त्यामुळे त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीय केल्याची चर्चा रंगलीय. भाजपचं पुणे महापालिका, बहुतांश विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे फडणवीसांच्या गेल्या 3 महिन्यात पुण्यातल्या गाठीभेटी वाढत असल्याचं बोललं जातयं.आता नजर टाकुया गेल्या काही महिन्यातील मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यांवर.
17 मे: फडणवीसांच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
17 मे: बाणेर येथील कॅन्सर हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांनी केलं उद्धाटन
16 जून: पुणे ते साईनगर शिर्डी एक्सप्रेसच्या लोकार्पण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती
26 जून: सारथी संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला पुण्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
18 जुलै: पुणे जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री उपस्थित
1 ऑगस्ट: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
11 ऑगस्ट: मुख्यमंत्र्य़ांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन
11 ऑगस्ट: ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या वतीने आयोजित समिट
एकंदरित राजकीय विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे लोकसभा भाजपसाठी सेफ मतदारसंघ आहे. सध्या पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करत आहेत. असे असतानाही फडणवीसांचे पुण्यातील वाढत्या दौऱ्यांमुळे 2029 च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलय.
याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत जाण्याच्या आणि पुणे मतदारसंघातून निवडणुक लढवण्याच्या चर्चा फेटाळून लावल्य़ा आहेत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांमधील यश आणि शहराचा होणारा सर्वांगीण विकास यामुळे मुख्यमंत्र्यांची पुण्यातील लोकप्रियता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत जाण्यासाठी वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. तितकाच मानसन्मानाचा मतदारसंघ म्हणजे पुणे. त्यामुळे चर्चा तर होणारच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.