Devendra Fadnavis about Gandhi and Godse saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : राहुल गांधींना दोष देणार नाही, कारण ते वाचत नाहीत; जाहीरनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis on rahul gandhi statement : 'मी राहुल गांधी यांना दोष देणार नाही. कारण ते वाचत नाही. त्यांना कोणी लिहून दिले असेल. त्यांनी वाचून मत व्यक्त केलं असतं तर त्यावर बोलले असतो, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Devendra fadnavis on rahul gandhi :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी राहुल गांधी यांना दोष देणार नाही. कारण ते वाचत नाहीत. त्यांना कोणी लिहून दिले असेल. त्यांनी वाचून मत व्यक्त केलं असतं, तर त्यावर बोलले असतो, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली.

'भाजप संकल्पपत्र कागद नसून मोदींची गॅरंटी आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास असल्याने देशात आणि राज्यात तिसऱ्यांदा महायुती सरकार निवडून आणतील. काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे. राजस्थान, कर्नाटकमध्ये जाहीरनामा दिला, त्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही, त्यांच्यासाठी कागद आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाचं सोडावं, ते कर्नाटकातील आहे. त्यांनी तिथे दिलेले आश्वासन आधी पूर्ण करावे,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधन होतं म्हणून चहावाला व्यक्ती पंतप्रधान झाले. गेली १० वर्ष पूर्ण बहुमत असताना नरेंद्र मोदींनी संविधान रक्षण केले, बदलेले नाही. संविधान बदलले हा काँग्रेचा जुमला आहे. त्यांना पराभव दिसला की, ते लोकांना गोंधळात टाकतात. त्यांनी हा प्रयत्न केला आहे, असे फडणवीस पुढे म्हणाले.

' अग्निवीर योजना रद्द करणे म्हणजे देश धोक्यात टाकणे आहे. सैन्याने सांगितलं, आम्हाला सीमेवर युवा हवे, युवा सैन्य नसेल तर सुरक्षित ठेवता येणार नाही. राहुल गांधी यांना 1 लाख, 5 लाख जे लिहायचं ते लिहा, पण ट्रक रेकॉर्ड दाखवा. त्यांना माहिती आहे, की ते सत्तेत येणार नाही त्यामुळे ते ताजमहाल बांधून देऊ अस देखील म्हणतील. सर्व समाजाला सामावून घेणार संकल्प पत्र आहे. काँग्रेसला ओबीसीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले.

'काँग्रेस भाजपला वॉशिंग मशीन म्हणतात, पण लोकांना माहिती आहे, पारदर्शी सरकार मोदीच देतात. जेव्हा यांचे जुमले संपतात, तेव्हा संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात येणार हे मुद्दे आणतात, अशी टीका फडणवीसांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

Sanjay Gaikwad: राऊत यांच्या मायचा #@XXX..., संजय गायकवाड यांची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT