Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the Assembly during the Budget Session on Marathi education and school statistics. Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील २ हजार मराठी शाळा बंद पडल्या? CM फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली

Devendra Fadnavis On Marathi Education Policy: राज्यात दोन हजार मराठी शाळा बंद पडल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रात ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असल्याची आकडेवारी सादर करत चुकीच्या बातम्यांवर त्यांनी भाष्य केले.

Omkar Sonawane

मुंबई : राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असून मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळांबाबत केवळ भावना व्यक्त करून उपयोग नसून ठोस कृतीची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सध्या ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून तब्बल ६९ टक्के विद्यार्थी मराठी शिक्षण घेत असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. विरोधकांनी मराठी शाळा बंद पडत असल्याचा आरोप केला.यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. राज्यात दोन हजार मराठी शाळा बंद पडल्याचा आरोप वारंवार केला जातो, मात्र असा आत्मविश्वास येतो कुठून? असा सवाल करत त्यांनी या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठी शाळा बंद करण्याबाबतची माहिती पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाचाही उल्लेख केला. अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण मातृभाषेत घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवताना विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञानही आत्मसात करणे आवश्यक असल्याचे नमूद करत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल शिक्षणात महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT