Maharashtra Cabinet Decision CMOMaharashtra / X
महाराष्ट्र

Cabinet Meeting : फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय, वाचा मंत्रिमंडळ बैठकीत काय काय झालं?

Fadnavis government, cabinet meeting : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे आणि मोठो निर्णय घेण्यात आले. त्याचा फायदा पुणे आणि बीड जिल्ह्याला सर्वाधिक होणार आहे.

Namdeo Kumbhar

Fadnavis Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मंत्रि आजच्या बैठकीला हजर राहिले नव्हते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ?

1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.

(विधी व न्याय विभाग)

2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी

(वित्त विभाग)

3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी

(मदत व पुनर्वसन विभाग)

4) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.

(नियोजन विभाग)

5) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी

(कृषि व पदुम विभाग)

6) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी

(कृषि व पदुम विभाग)

7) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT