Supriya Sule-Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule: देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, क्राईम आणखी वाढतो; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

Supriya Sule On Devendra Fadnavis: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल करत आरोप केला आहे.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. शुक्रवारी देखील पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. भरदिवसा गोळ्याझाडून हत्या केल्याने संपूर्ण पुणे शहर हादरलंय. अशात या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवीसांवर निशाणा साधत गंभीर आरोप केलेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड होत आहे. हे गृहमंत्री आणि गृह खात्याचं सपशेल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल करत आरोप केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी पुण्यातल्या कोयता गँगचा देखील उल्लेख केला. पुण्यात महिला मला भेटतात आणि म्हणतात आम्हाला कोयता गँगची फार भीती वाटते. आमचं सरकार असताना होती का कोयता गँग?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी जनतेला विचारला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर अन्याय झालाय?

महाराष्ट्राचे गृहमंत्री ४५+ मध्ये व्यस्त आहेत. त्यांना अधिकार नक्की किती आहेत हे समजत नाही. देवेंद्र फडणवीस आता टिव्हीवर फार दिसत नाहीत. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात पण आधी सारखे देवेंद्र जी दिसत नाहीत. आमचं पटो न पटो आधी ५ वर्ष ते नेहमी मुख्यमंत्री म्हणून टिव्हीवर दिसत होते. आता दिसत नाहीत. कधीतरी नागपूर विमानतळावर दिसतात एक प्रश्न घेतात आणि नमस्कार करून निघून जातात, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना कोपरखळ्या दिल्यात.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्यायल झालाय. त्यांना डावलण्यात आलं, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलं की, देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये किती active आहेत माहीत नाही. मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आहे. वर्गात सर्वात पाहिले आले आणि त्यांना मागे बसवलं. मुख्यमंत्रीवरून त्यांना हाफ मुख्यमंत्री केलं, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT