rohit patil, devendra fadnavis, mla sumantai patil, sangli news saam tv
महाराष्ट्र

Sangli News : टेंभूबाबत देवेंद्र फडणवीसांचे सुमनताईंना आश्वासन, उपाेषणावर राेहित पाटील स्पष्टच बाेलले

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे देखील उपोषणकर्ते रोहित पाटील यांना भेटले. उपोषण मागे घेण्याबाबत बाबर यांनी देखील पाटील यांना विनंती केली.

विजय पाटील

Mla Sumantai Patil News : एका महिन्याच्या आत टेंबूला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल असे आश्वासन आज (मगळवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आमदार सुमनताई पाटील यांना दिले. यावेळी फडणवीस यांनी आमदार पाटील यांना बेमुदत उपाेषण मागे घ्यावे अशी विनंती केली. (Maharashtra News)

टेम्भू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील या साेमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राेहित पाटील व शेकडाे कार्यकर्ते देखील आहेत.

आज दुपारच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यावेळी फडणवीस यांनी एका महिन्याच्या आत टेंबूला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी राेहित पाटील यांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा ऑडिओ आंदोलनस्थळी ऐकवला.

18 गावातील शेतक-यांची चर्चा करणार

राेहित पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना आपल्या आंदोलनाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. दाेघांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन हे सर्वांना कळविले आहे.

आता 18 गावातील शेतक-यांची चर्चा करून आंदाेलनाची दिशा ठरवली जाईल असेही रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.

राेहित पाटील यांची तब्येत स्थिर

दरम्यान युवा नेते रोहित पाटील यांची तब्येत आज पुन्हा बिघडली. त्यामुळे तात्काळ वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय पथकाने तातडीने उपोषणस्थळी धाव घेऊन रोहित पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली.

रोहित यांना अशक्तपणा जाणू लागल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांना 101 डिग्री इतका ताप असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले. त्यांच्या रक्ताचे नमुने सुद्धा देण्यात आले. यातून कोरोना, जीका, डेंगू आणि मलेरिया यासारख्या तसेच सीबीसी या तपासण्या केल्या जाणार आहेत.

सध्या रोहित पाटील यांची तब्येत स्थिर असल्याचे वैद्यकीय प्रमुखांनी सांगितलं मात्र त्यांना ऑब्झर्वेशनची गरज असल्यास वैद्यकीय पथकाने यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT