Devendra Fadnavis On Sambhajinagar  saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात; सर्वांनी शांतता बाळगा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन

Devendra Fadnavis News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय डाफ

Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर आता परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. परंतु आता यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी यामागे भाजप आणि एमआयएम असल्याचा आरोप केला आहे, तर चंद्रकांत खैरे यांनी हे राज्य सरकारचं अपयश आहे असे म्हटले आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटनेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोक प्रक्षोभक वक्तव्ये करून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कुणी असे चुकीचे वक्तव्ये करत असतील तर त्यांनी ते करू नये. सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केल आहे.

स्वार्थासाठी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न - फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्व नेत्यांची आहे. मला वाटत की याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर यापेक्षा दुर्देवी काही नाही. अशी वक्तवे कुणी असतील तर ते किती संकुचित बुद्धीचे आहेत याचाच परिचय ते देत आहेत, असे फडणवीस म्हणाले. तसेच स्वत:च्या स्वार्थासाठी हा त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी हे तात्काळ थांबवले पाहिजे. सर्वांनी रामनवमीचा कार्यक्रम शांततेत पार पडावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

चंद्रकांत खैरे यांचा एमआयएम-भाजपवर आरोप

महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभेत विघ्न घालण्यासाठी भाजप आणि एमआयएम जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पोलिसांनी इम्तियाज जलील याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी. या सर्व षडयंत्र मागे कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

SCROLL FOR NEXT