Accident News Saam
महाराष्ट्र

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक, २० जण जखमी; गॅस गळतीमुळे वाहनं-घरांना आग | VIDEO

Niwali Ghat Tragedy: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. एलपीजी गॅस टँकर आणि प्रवासी मिनी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अनर्थ घडला.

Bhagyashree Kamble

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. एलपीजी गॅस टँकर आणि प्रवासी मिनी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडल्याची माहिती आहे. टँकरच्या जोरदार धडकेनंतर मिनी बस दरीत कोसळली, तर टँकरमधून गॅस लीक होऊन आजूबाजूच्या परिसरात आग लागली. मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात गॅस टँकरच्या धडकेने मिनी बस उलटली. मिनी बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. मिनी बसमधील २० ते २२ प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

तर, गॅस टँकरमधून गॅस लिकेज झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. या आगीत महामार्गालगतचं घर, आंब्याची बाग, चारचाकी, दुचाकी, रिक्षा यांचं मोठं नुकसान झालं असून, काही जनावरांना देखील आगीचा फटका बसल्याची माहिती आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने मिनी बसला धडक दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT