Suvarna Kotkar Saam TV
महाराष्ट्र

शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जामीन मंजूर

आरोपी कोतकरने २ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

सचिन आगरवाल

नगर: केडगाव हत्याकांड प्रकरणात (Kedgoan Murder Case) आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Ahmadnagar Court) अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. गुरूवारी अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश कुरतडीकर यांनी निकाल दिला. केडगाव येथे सुमारे तीन वर्षापूर्वी दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या हत्याकांडात आरोपी म्हणून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर (Suvarna Kotkar) यांचा समावेश होता. हत्येपासून आरोपी सुवर्णा कोतकर फरार होती. आरोपी कोतकरने २ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकरला काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपी सुवर्णा कोतकरच्यावतीने न्यायालयात अॅड. विवेक म्हसे आणि अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील ३ तासात महत्त्वाचे; जळगाव,मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

बाजारात लाँच होणार तगडा स्मार्टफोन; पावरफुल प्रोसेसर, 7,300mAh ची बॅटरी आणि बरंच काही

Actor Prarthana Behere Dad Death : “बाबा काळजी करू नका, मी खूप…”, मराठी अभिनेत्रीला पितृशोक!

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहरातील पिण्याचा पाणीपुरवठा करणारी एक मोठी लाईन फुटली

फावड्यानं चिमुकलीचा जीव घेणाऱ्या आरोपीला पोलिसांची सूट; मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग मग..

SCROLL FOR NEXT