Ajit Pawar-Devendra Fadnavis Banners saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar-Devendra Fadnavis Banners : “ही दोस्ती तुटायची नाय” नागपुरात झळकले अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स

Nagpur News: राज्याचे दोन्ही उपमुख्यमत्री अजित पवार आणि देवेंद्र पडणवीस यांचा आज वाढदिवस आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics: राज्याचे दोन्ही उपमुख्यमत्री अजित पवार आणि देवेंद्र पडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचे सोबत फोटो असलेले बॅनर्स झळकले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर “ही दोस्ती तुटायची नाय” अशी मराठी गाण्याची ओळ लिहून दोघांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

एवढंच नाही तर या बॅनर्सवर “राजकारणातील ‘दादा’ अजित दादा आणि राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस असे देखील लिहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर एका बाजूला शरद पवार यांचा देखील फोटो आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे.

वृत्तपत्र जाहिरातीतही दोघांसोबत शरद पवारांचा फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत शरद पवारांचा फोटो आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीत दोघांच्या फोटोच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र एका चौकटीत ठेवण्यात आले आहे. (Tajya Marathi Batmya)

शरद पवारांच्या आवाहनानंतरही वापरला फोटो

यापूर्वीच शरद पवार यांनी आपला फोटो न लावण्याचे आवाहन केले होते. तरी देखील राष्ट्रवादीतला फुटीर गट पवारांचे फोटो बिनदिकत्त वापरत असल्याचे पहायला मिळत आहे. फुटीर गटाचे आमदार वारंवार पवारांना भेटने, बॅनरवर फोटो वापरणे या घटनांवर पवारांनी किंवा राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अशात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Latest Political News)

Ajit Pawar-Devendra Fadnavis Banners

पवारांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न?

बंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठीला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. परंतु अजित पवार गटाकडून वारंवार त्याचे फोटो वापरणे, त्यांची भेट घेणे असे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पवारांबाबत एक संभ्रम निर्माण करण्याचा डाव तर ना असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT