DRDO Scientist Honey Trap Case: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीप कुरुलकरची 'व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस' टेस्ट' होणार?

Pradeep Kurulkar Case Latest Updates: कुरुलकर यांच्या व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस चाचणीस परवानगी मिळावी, असा युक्तीवाद सरकार पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला.
DRDO Pradeep Kurulkar Latest News
DRDO Pradeep Kurulkar Latest NewsSaam TV
Published On

DRDO Scientist Pradeep Kurulkar Honey Trap Case: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस चाचणीस परवानगी मिळवण्यासाठी सरकार पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला.

सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेल्या लेखी युक्तीवादात म्हटले की, व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस चाचणीसाठी कुरुलकर यांच्या संमतीची आवश्यकता नाही. तपासाला दिशा मिळावी यासाठी ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चाचणीला परवानगी मिळावी. ॲड. फरगडे यांनी हा लेखी युक्तीवाद न्यायालयात सादर केला.

DRDO Pradeep Kurulkar Latest News
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? CM शिंदे तडकाफडकी दिल्लीला, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

कुरुलकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात नमूद केलेली कागदपत्रे अद्याप मिळालेली नाही. त्यातील बरेच जबाब सीलबंद आहेत. त्यामुळे जबाबात नेमके काय म्हटले आहे, याबाबतची माहिती मिळाल्यास युक्तीवाद करणे सोपे होईल, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. कुरुलकर यांच्या व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस चाचणीवर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. (Tajya Marathi Batmya)

काय आहे प्रकरण?

प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. (Latest Political News)

DRDO Pradeep Kurulkar Latest News
Maharashtra Landslide: माळीण, तळीये, इर्शाळवाडी… यापुढे काय? राज्यातील 1 हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार

चौकशीत दोषी आढळल्यानंतर गुन्हा दाखल

डीआरडीओच्या समितीच्या चौकशीत कुरुलकर (Pradeep Kurulkar) दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला. याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील कर्नल प्रदीप राणा यांनी मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com