Ajit Pawar On Nilesh Lanke Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar On Nilesh Lanke: मीच त्याला राष्ट्रवादीत आणलं, पण निलेश बदलला; लंकेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते काय म्हणाले आहेत, ते जाणून घ्या...

Satish Kengar

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि काही पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी भाषणात बोलताना खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मागच्या काळात निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं. पण माणसं महत्वाच्या पदावर गेल्यावर बदलतात. तसा निलेश बदलला, असं म्हणत अजित पवारांनी खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली. सोबतच निलेश लंकेच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकटीने पारनेरचे वाटोळे केलं, असं अजित पवार म्हणाले.

सुपा एमएडीसीचे अनेक कारखाने यायला तयार आहेत. फक्त वातावरण चांगले ठेवा. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मी सोडवून देईल, पण मी जो उमेदवार देईल त्याला साथ द्या. गाफील राहू नका, भावनिक होऊ नका, असा सल्ला देखील अजित पवारांनी उपस्थित पारनेरकरांना दिला.

दरम्यान, अजित पवारांचे भाषण सुरू असताना 'पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या', असं म्हणत अजित पवारांच्या सभेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर आणि कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले आणि "तुम्हाला लंकेंनी पाठवले आहे का?" असा सवाल केला.

अजित पवार यांच्या टीकेला निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''सामान्यचा आवाज आला त्यामुळे त्यांनी माझं नाव घेणे, बच्चा बच्चा पण आमचं नाव घेतो. सगळ्या राज्याला माहिती आहे, कोणाच्या घरात किती पदे आहेत. त्यांना उत्तर 23 तारखेला समजेल. महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतं मिळतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT