मुंबई : भारतीय समाज, आदिवासी जीवनपध्दती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या जेष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट gail omvedt उर्फ शलाका भारत पाटणकर श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे आज (बुधवार) कासेगाव (जि. सांगली) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह, महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्याने मांडले.
क्रांतीवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना आयुष्यभर समर्थपणे साथ दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी झाल्याचे उपमुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.