dengue outbreak in hatkanangale 100 patients of alte village admitted in hospital  Saam Digital
महाराष्ट्र

Dengue Outbreak In Hatkanangale: हातकणंगले तालुक्यात डेंग्यूचा कहर, मिरजसह इचलकरंजीत रुग्ण उपचारार्थ दाखल

100 patients of dengue alte village admitted in hospital hatkanangale: ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी आळते ग्रामस्थांकडून हाेऊ लागली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

हातकणंगले तालुक्यातील आळते गावात डेंगूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे चित्र आहे. सध्या गावात 100 पेक्षा अधिक डेंगू सदृश्य रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हातकणंगले तालुक्यातील आळते गावात गेल्या काही महिन्यापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे गावक-यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक हाेते परंतु तसे झाले नसल्याचा आराेप हाेऊ लागला आहे.

गावात डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली तरी जिल्हा आरोग्य विभागाने म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. सध्या आळतेसह मिरज शासकीय रुग्णालय आणि इचलकरंजीतल्या आयजीएम रुग्णालयात डेंगू सदृश्य रुग्ण (ग्रामस्थ) उपचार घेत आहेत.

ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले सध्या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आराेग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये समन्वय नसल्याने डेंगू सदृश्य रुग्ण वाढू लागले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययाेजना कराव्यात अशी मागणी मुजावर यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT