सोलापूर : बार्शीत बैलपोळ्यानिमित्त Bailpola कोरोनाची जनजागृती Corona Awarness करण्यात आली आहे महाराष्ट्रात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षापासून या सणावरती कोरोनाचे सावट असल्यामुळे तो अत्यंत साध्यापणाने साजरा करण्यात येत आहे आणि सोबतच कोरोनाचे संकट ओळखुन या सणांमधून हि बळीराजाने कोरोनाची जनजागृती केली आहे. Delivered from the back of the bull, the message of Corona awareness
हे देखील पहा-
बैलपोळा या सणाकडे शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून बघितलं जातं मात्र, गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या Farmers Festival या सणावरती कोरोनाच सावट आहे. त्याच अनुषंगाने बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम कापसे यांनी कोरोनाची जनजागृती केली आहे. बैलांच्या पाठीवरती "कोरोनाचे नियम पाळा तिसरी लाट टाळा", 'लस घ्या कोरोना टाळा","गो कोरोना गो" असं लिहत कोरोनाविषयी जागरुक रहा आणि कोरोनाला हद्दपार करा असा संदेश देण्यात आला आहे.
यंदा कोरोनामुळे बैलांची मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला आहे. गेल्या 45 वर्षांपासूनची बैलपोळा सणाची परंपरा त्यांनी खंडित होऊ दिलेली नाही. सोन्या आणि शिल्या या बैलांवर केलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या बैलपोळ्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.