wari 2021 
महाराष्ट्र

विठूरायाच्या जयघाेषात देहूत अश्व रिंगण साेहळा रंगला

दिलीप कांबळे

मावळ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील मुख्य मंदिरात आज (मंगळवार) दुसरे गोल अश्व रिंगण पार पाडले. प्रति वर्षाची परंपरा जपत काेविड 19 चे नियमांचे पालन करीत मोजक्या वारकऱ्यांच्या wari 2021 उपस्थितीत हा रिंगण साेहळा झाला. या सोहळ्या दरम्यान वरुण राजाची लागलेली हजेरी भाविकांना सुखावून गेली. (dehu-wari-2021-gol-ringan-covid19-pandemic)

विठुनामाच्या गजरात रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.

दरम्यान, पालखी तळावर देहू संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रिंगण सोहळ्यास दुपारी दोन वाजता ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात प्रारंभ झाला. प्रथम पताकावाले झेंडेकरी नंतर तुळस व हंडा घेतलेल्या महिला, टाळकरी, विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केल्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले.

दरवर्षी इंदापूर येथे होणाऱ्या या रिंगण सोहळ्यात अकलूजचे मोहिते पाटील आणि बाभुळ गावचे बाभुळगावकर यांच्या अश्वाला हा मान असतो. परंतु देहूच्या मुख्य मंदिरात हा सोहळा होत असल्यामुळे यावर्षी अश्वाचा मान टाळगाव चिखली मधील दत्तात्रय कोंडीबा मळेकर यांच्या अश्वास मिळाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम या जय घोषात भाविकांनी झिम्मा, फुगड्या, मानवी मनोरे आदी खेळांचा आनंद लुटला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT