नांदेड : देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी घेतलेल्या निर्णायक आघाडीमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जल्लाेष करण्यास प्रारंभ केला आहे. अंतापूरकरांनी २९ व्या फेरी अखेर 41 हजार 557 मताधिक्य घेतले आहे. काॅंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजपच्या कारभारावर टीका करीत जनता भाजपला कंटाळले आहेत हे जनतेने दाखवून दिल्याचे नमूद केले. Deglur Biloli Bypoll Election Result Deglur ByElection Congress Ashok Chavan Jitesh Antrapurkar Subhash Sabane Amar Rajurkar
अमर राजूरकर म्हणाले आज ख-या अर्थाने रावसाहेब अंतापूरकर यांना जनतेने श्रद्धांजली वाहिली आहे. आमचे नेते अशाेकराव चव्हाण यांचे सुक्षम नियाेजन आणि महाविकास आघाडीचे प्रचाराचे उत्तम नियाेजन झाल्याने हा विजय मिळाला आहे. आज जनतेला महागाईची झळ पाेचत आहे. पेट्राेल, डिझेल, गॅसचे दर वाढले. भाजप काय करीत आहे फक्त विराेधकांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्रास देणे. एवढेच काम ते महाराष्ट्रात करीत असल्याने जनतेस हे आवडलेले नाही हे आजच्या विजयाने दाखवून दिले आहे.
आजच्या विजयामुळे देगलूरकरांनी महाविकास आघाडीची ताकद मजबूत केली आहे. पंढरपूरात भाजपने कट कारस्थान केले हाेते. तेथे महाविकासला यश मिळाले नाही परंतु देगलूरकरांनी शिवसेनेच्या गद्दार उमेदवारास पाडून टाकले आणि त्याचा बदला महाविकासच्या माध्यमातून घेतला असे काॅंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी नमूद केले.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील देगलूरकरांचे आभार मानले. संपुर्ण मतदारसंघ शिवसेनेने फिरुन महाविकासचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यास जितेश अंतापूरकरांच्या माध्यमातून यश मिळाले आहे. गद्दारास धडा शिकवून पंढरपूरचा वचपा देगलूरकरांनी काढला याचा आम्हांला आनंद वाटत असल्याचे शिवसैनिकांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.