देगलूर विभानसभा मतदारसंघात आज नेत्यांची मांदियाळी Saam TV
महाराष्ट्र

देगलूर विभानसभा मतदारसंघात आज नेत्यांची मांदियाळी

आज भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या तीन सभा होणार आहेत.

संतोष जोशी

नांदेड: देगलूर विधानसभा मतदारसंघात (Deglaur Assembly constituency) नेत्यांची मांदियाळी राहणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आल्याने पंढरपूर पोट निवडणुकीची (Pandharpur By- Election) पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली तर भाजपने पंढरपुरची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा कामाला लावली आहे. आज भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या तीन सभा होणार आहेत.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते, मंत्री धनंजय मुंडे , नवाब मलिक, पालकमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्या सभा होणार आहेत. वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची देगलूर मध्ये सभा होणार आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी कोरोनाचे निर्बंध झुगारून नेते मंडळी सभा झोडताहेत या कडे निवडणूक आयोगाचे वा प्रशासनाचे लक्ष गेले नाही का असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT