Deepak Kesarkar, Zilla Parishad School Teachers saam tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar News : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे स्वप्न पूर्ण हाेणार ? शिक्षणमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घाेषणा

राज्यासाठी हा प्रकल्प रोलमॉडेल ठरेल असे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Deepak Kesarkar News : राज्यात बीओटी आणि 'दत्तक शाळा' संकल्पना राबवणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसकर (Deepak Kesarkar In Loni) यांनी नमूद केले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाऴेतील शिक्षकांना (zilla parishad teachers) एकाच ठिकाणी नोकरी करता येईल यासाठी धोरण आणणार असल्याचा मनाेदय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. (Breaking Marathi News)

राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यातील लोणी गावात बांधा..वापरा..हस्तांतरीत करा.. तत्वावर जिल्हा परीषदेची पहिली शाळा उभारण्यात आली आहे.

बीओटी तत्वामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुपडे पालटले असून खाजगी शाळांप्रमाणे सुविधा याठिकाणी मिळणार आहे. या शाळेचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार) झाले. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा पारिषद शाळा सुधारण्याचे उत्कृष्ट मॉडेल विखे पाटलांनी नगर जिल्ह्यात करून दाखवलं असे नमूद केले. केसरकर पुढे म्हणाले राज्यात जिथे शक्य आहे तिथे बीओटी तत्वावर शाळा उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सातत्याने बदलीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आता एकाच ठिकाणी नोकरी करता येईल यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचा मनाेदय शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाईल असेही केसरकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT