Anil Gote Saam Tv
महाराष्ट्र

Anil Gote: नकाने तलावाची खालावली पाणी पातळी; माजी आमदार अनिल गोटेंचा भाजपवर हल्लाबोल

Lake Nakane: तब्बल २५४ वर्षानंतर नकाने तलावाची पाणी पातळी खालावली आहे. सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना अक्कलपाडा धरणाचे पाणी पुरवण्याच्या आशेवर धुळेकरांना तब्बल ५ वर्ष झुलवत ठेवले असल्याचा देखील आरोप अनिल गोटेंनी केला आहे.

Bharat Jadhav

(भूषण अहिरे)

Anil Gote On Lake Nakane Water level:

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत घट झालीय. पाणीसाठ्यात घट झालीय. धुळे शहरातील नाकाने तालावातील पाणी पातळी खालावली असून यावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. (Latest News)

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून हा निशाणा साधला. तब्बल २५४ वर्षानंतर नकाने तलावाची पाणी पातळी खालावली आहे. सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना अक्कलपाडा धरणाचे पाणी पुरवण्याच्या आशेवर धुळेकरांना तब्बल ५ वर्ष झुलवत ठेवले असल्याचा देखील आरोप त्यांनी या पत्रकातून केला.(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान ते १६ जानेवारी रोजी नकाणे तलावाच्या एक्सप्रेस कॅनोलला भेट देण्यासाठी जाणार असल्याचं गोटे यांनी सांगितले. माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पाटबंधार विभागाला कळविले असून, तत्पूर्वी नकाणे तलावात पाणी वाहून नेणारा एक्सप्रेस कॅनोल हा दुरुस्त झालाच पाहिजे,असे देखील गोटे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

नाशकात भीषण पाणीटंचाईचे सावट

दरम्यान यंदा नाशिकमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाची समस्या निर्माण झालीय. नाशिकमध्ये पावसाने सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यात भूजळ पातळीत घट झालीय. आतापर्यंत ही भूजल पातळी २.१३ मीटरपर्यंत घटलीय. नाशिकमध्ये दिडोंरी तालुक्यात किमान ०.५ तर चांदवड तालुक्यात २.१३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल पातळी घटल्याने जिल्ह्यात दुष्काळाचा निर्देशांक वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

उष्माघातामुळे 7 जणांचा बळी, महाराष्ट्राने गाठला तापमानाचा नवा उच्चांक

Tuesday Horoscope: कामातले वाद मिटतील, ५ राशींवर गणपती बाप्पा होणार प्रसन्न, हाती येईल अचानक पैसा

वंदे भारत ट्रेनला अपघात; मुंबईहून सुटलेल्या ट्रेनचा डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला

SCROLL FOR NEXT