drought saam tv
महाराष्ट्र

Jat News : दुष्काळ जाहीर करा... जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले, शुक्रवारी लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येत्या २७ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्वपक्षीय नेते एकत्र येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. (Maharashtra News)

जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून, दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजलेला आहे. जत तालुका १००% अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमधील सद्यस्थित शिल्लक पाणीसाठा ३% असून एकूण २७ तलावांपैकी १० तलावांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा म्हणजे कोरडे असून उर्वरित तलावामध्ये मृतसंचय पाणी साठ आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी जीवनावश्यक अन्नधान्य पेरणी खरीप हंगामातील केवळ ५८ % झाली असून पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.. रब्बी हंगाम पेरणी करणे शक्य नाही. तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सध्या २५ गावांमध्ये २९ टॅकर द्वारे पाणी पुरवठा सुरु असून सध्यपरिस्थिती अशी असताना नागपूर येथील क्षेत्रीय सर्व्हेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राच्या मोबाईल ॲपद्वारे चुकीचे सर्व्हेक्षण झाल्याने जत तालुका दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी तालुक्यांमध्ये जत तालुक्याचा समावेश झालेला नाही.

तरी शासनाकडून वस्तुस्थितीचे सर्वेक्षण होऊन त्वरित जत तालुका दुष्काळ जाहीर करावा यासाठी जत तालुक्यातील तमाम जनतेमार्फत सर्वपक्षीय २७ ऑक्टोंबर रोजी लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर करणार आहेत अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवदेन देण्यात आले. यावेळी काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (ठाकरे गट) सागर पाटील, शिवसेना जत तालुका पश्चिम विभाग अध्यक्ष संजीव कुमार सावंत, बहुजन समाज पार्टी, रिपाई, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदीजन उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT