jat, sangli, rain, drought saam tv
महाराष्ट्र

Sangli News : राज्यभरात पावसाची हजेरी जत तालुका काेरडाच, काँग्रेस आमदारासह 65 गावांनी कर्नाटकात जाण्याची केली मागणी (पाहा व्हिडिओ)

प्रशासनाकडून तसेच राज्य सरकारकडून मागण्यांबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदाेलकांनी केला आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत (congress mla vikram sawant) यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 हुन अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केले आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

पिण्याच्या पाण्यापासून (rain) जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या जवळपास शंभर टक्के वाया गेल्या आहेत. पाण्याच्या टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत होता जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.

जत तालुक्यातल्या संख येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी चक्री उपोषण सुरू आहे. राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल, दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर आता आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांसह बाबासाहेब कोडग (माजी सभापती) तसेच सरदार पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT