निवृत्तीवेतनासाठी मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणला  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

निवृत्तीवेतनासाठी मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणला

दीपक क्षीरसागर

लातूर : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन मिळत नसल्यामुळे मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह नातेवाईकांनी औसा तहसील कार्यालयासमोर आणून ठेवत तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला. प्रकाश देशमुख परीट हे तहसील कार्यालयात कार्यरत होते. ते ३० एप्रिल २०१९ रोजी निवृत झाले. त्यांची २ ऑगस्ट रोजी रात्री देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हे देखील पहा -

निवृत्तीवेतन थकल्यामुळे कुटुंबात आर्थिक अडचणी येत होत्या. पेन्शन मिळावी म्हणून सतत पाठपुरावा करून सुद्धा पेन्शन मंजुरीच्या कार्यवाहीस विलंब होत असल्याची तक्रार मृत कर्मचाऱ्याची मुलगी प्रियंका जाधव यांनी करीत या प्रकरणी दोषींवर कार्यवाही होईपर्यंत आम्ही मृतदेह तहसील कार्यालयासमोरून हलवणार नाही अशी भूमिका घेतली.

नातेवाईकांनी औसा तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला. मयत कर्मचारी मुकुंद देशमुख यांच्या निवृतीवेतनाचे काम प्रशासकीय स्तरावर चालू असल्याची माहिती तहसीलदार शोभा पुजारी यांनी दिली. ऑनलाईन प्रणाली व इतर कारणामुळे वेळ लागत असला तरी या प्रकरणी दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी नातेवाईकांना दिले आहे. 30 जुलै 2019 रोजी ऑनलाइन प्रक्रिया केली असून राहिलेली रक्कम मिळण्याची कार्यवाही दोन-तीन दिवसात करण्यात येईल असेही तहसीलदार यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच सेवा पुस्तकात महालेखाकार कार्यालय नागपुर यांनी काढलेल्या त्रुटीची पूर्तता ताबडतोब करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी व इतर रक्कम देण्यात आली असून तात्पुरत्या स्वरूपात पेन्शन मंजुरी दिली आहे. या प्रकरणी महसूल विभागाचे कर्मचारी दोषी असल्याचा आरोप मयताचे नातेवाईक करत होते. दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी दोन तासानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी टाका येथे नेला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

SCROLL FOR NEXT