saam tv
महाराष्ट्र

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Solapur Family Finds Dead Snake In Ration Rice: सोलापुरातील मोदी परिसरात राहणाऱ्या राम भंडारे यांनी रेशन दुकानातून तांदूळ आणले होते. त्यात मेलेला साप आढळून आला होता. दरम्यान सोलापूरमधील अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घधेत तांदूळ तपासणीसाठी पाठवलाय.

Bharat Jadhav

  • सोलापुरातील रेशनच्या तांदळात मेलेला साप आढळल्याने खळबळ.

  • भंडारे कुटुंबाला रेशन तांदळाच्या गोणीत साप सापडला.

  • अन्न पुरवठा विभागाने तपासणी सुरू केली, नागरिकांनी संताप व्यक्त केला.

तुम्ही रेशन दुकानातील धान्य घेत आहात? तर सावधान. सोलापूरातील बातमी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रेशनच्या तांदळात चक्क मेलेला साप आढळून आलाय. मोदी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे रेशन दुकानातील धान्यच्या गुणवत्ते बाबतचा प्रश्न पु्न्हा एकदा ऐरणीवर आलाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोदी परिसरात राहणाऱ्या भंडारे कुटुंबाने रेशन दुकानातून तांदूळ आणले होते. त्या तांदळात मेलेला साप आढळून आल्याने खळबळ माजीलय. अशा निकृष्टपद्धतीच्या धान्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मोदी परिसरातील राम भंडारे या रेशधारक व्यक्तीने रेशनचे धान्य घरी आणले होते. यानंतर चार दिवस भंडारे कुटुंबाने हे तांदूळ शिजवून खाल्ल्याची माहिती आहे. पण तांदळाच्या गोणीत मेलेला साप आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय.

दरम्यान ही बाब भंडारे कुटु्ंबाने उघड केल्यानंतर अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी तांदूळ जप्त केलाय. त्यांनी घटनेबाबत पंचनामा केल्यानंतर तांदूळ फॉरेन्सिकसाठी पाठवलाय. याबाबतचा अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला साई भक्ताच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न चोरट्याला बेदम चोप

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

SCROLL FOR NEXT